काही माणसे जादुई असतात . त्यांच्या सहवासात अशी काही जादू असते कि सर्व
मळभ दूर होते. असेच एक आहेत आमचे आकाश मित्र श्री गोखले. वय वर्ष फक्त ७०.
ह्या वयात देखील गोखले सर दर रविवारी बदलापूर ते कल्याण ट्रेनने येतात.
उंचपुरे व्यक्तीमत्व. पण या वयातही पाठीला बाक नाही. चालणे सरळ ताठ . माझा
आकाशमित्र संस्थेशी परिचय फक्त ४ महिन्यांचा . रविवार ते रविवार . त्यामुळे
ते माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत असे म्हणता येणार नाही . पण त्यांचा
उत्साह पाहूनच समोरचा व्यक्ती ताजातवाना होईल. ते बँकेतून निवृत्त होवून
२० वर्ष झाले असतील. नित्य नियमाने रविवारी ४.३० ला आकाशमित्र मध्ये हजर
होतात. मला त्यांनी आज सांगितलेला किस्सा सांगावासा वाटतो म्हणून हा
खटाटोप. आम्ही घरी जात असताना विषय निघाला हिंदू पुराणामध्ये असलेल्या
कर्म कांड मागील विज्ञान.
गोखले म्हणाले " एकदा आम्हा गोखल्यांचे संमेलन भरले होते. तिथे मला एक " गोखल्या" भेटला. मी मुद्दाम त्याचा उल्लेख गोखल्या करतोय कारण तो होताच भोंदू. त्याने एक लोलक (pendulum ) आणला होता. तो त्याने त्यांच्या कुलदैवताच्या फोटो वर धरला. थोड्या वेळाने तो आपोआप गोलगोल फिरू लागला. म्हणाला पहिला चमत्कार. आपल्या कुलदैवताची शक्ती. मी बाजूला बसलेल्या आणखी एका गोखाल्याकडून मागझीन घेतले . त्याच्या मलपृष्ठावर एका सुंदर बाईचे ' देखणे ' चित्र होते. मी ते घेतले . त्या गोखल्या कडून तो लोलक घेतला व तो त्या चित्रावर धरला. थोड्या वेळाने लोलक पुन्हा गोलगोल फिरू लागला . मी म्हणालो पहिला चमत्कार , दैवी शक्ती. हे लोलक फिरते त्या मागे विज्ञान आहे. हाताची कंपने हे लोलक फिरवतात. सर्व उपस्थित गोखले हसू लागले. पण ते पाहायला गोखल्या होता कुठे. तो केव्हाच पसार झाला होता.
असे हे गोखले. ब्राह्मण असूनही कर्म कांड पासून दूर. डोळस दृष्टीने जग पाहणारे.

This comment has been removed by the author.
ReplyDeleteLolak mhanje ky?
ReplyDelete