Monday 28 February 2011

 जीवनात प्रत्येकाचे वेगवेगळे रुटीन असते. ते सांभाळून आपल्या आयुष्यात काही मजेदार  गोष्टी घडत असतात. 
अशीच एक गोष्ट रविवारी घडली. मी काही लोकांना माझ्या क्लासमधून काही पैसे देणे लागतो. मी रविवारी लोकल मधून कल्याणला येत होतो. मला प्रवासात नेहमी काही तरी वाचायला हवे असते. सवयीप्रमाणे माझ्या हातात पुस्तक होते. पुस्तकाचे नाव होते " जगातील प्रसिद्ध फसवणुकीच्या कथा". आणि अचानक घाटकोपरला माझ्या बाजूच्या ओळीमध्ये माझी जुनी विद्यार्थिनी व तिचे पालक येवून बसले. खरे म्हणजे मी काही जास्त देणे लागत नव्हतो. पण त्यांनी खूप वेळा मला फोन करून पैश्याबद्दल विचारणा केली होती. पण मी मात्र त्यांना टाळत होतो. गाडी मध्ये गर्दी नव्हती. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे पहिले. नंतर माझ्या हातातील पुस्तकाकडे पहिले. आणि मग आपापसात काही तरी कुजबुजले. नक्की म्हणाले असतील कि एकदम योग्य पुस्तक वाचतोय. कदाचित त्यांनी सार्वजनिक ठिकाणाचे भान ठेवले असेल. पण ते काही बोलले नाही.मी मात्र चोरट्या सारखी नझर फिरवून बसलो. आणि ठाणे स्टेशनला उलरलो.