Friday 30 September 2011

"ती"


जग  आहे नंदनवन
मोद आहे भरला आसमंती
असे वाटते तेव्हा  जेव्हा
समोर असते " ती"

क्षणात बदलतात ऋतू 
हर्ष  धारा कोसळू लागती
हृदयी  वसंत फुलू लागतो
जेव्हा समोर असते "ती"

जिवंत होतो सारा निसर्ग
मन मारू लागते भरारी
आता होते हिमगिरी
आणि आता सागर किनारी
घडू लागते क्षणात सारे
जेव्हा समोर असते " ती"

असेच सारे घडता घडता
होते सारे क्षणात क्षति
बनते उजाड माळरान हे विश्व
जेव्हा समोर नसते  "ती"

No comments:

Post a Comment