Friday 30 September 2011

"ती"


जग  आहे नंदनवन
मोद आहे भरला आसमंती
असे वाटते तेव्हा  जेव्हा
समोर असते " ती"

क्षणात बदलतात ऋतू 
हर्ष  धारा कोसळू लागती
हृदयी  वसंत फुलू लागतो
जेव्हा समोर असते "ती"

जिवंत होतो सारा निसर्ग
मन मारू लागते भरारी
आता होते हिमगिरी
आणि आता सागर किनारी
घडू लागते क्षणात सारे
जेव्हा समोर असते " ती"

असेच सारे घडता घडता
होते सारे क्षणात क्षति
बनते उजाड माळरान हे विश्व
जेव्हा समोर नसते  "ती"

Sunday 4 September 2011

हे गणराया

हे गणराया ,
का केलास विलंब तुझ्या आगमना ,
पाहुनी वाट युगे युगे,
नेत्र आसुसले तव दर्शना     //

हे गणराया ,
झाले तुझे आगमन
माझिया मन मंदिरी ,
व्यापून टाकलेस विश्व माझे,
सर्वदुरी मनी अंतरी                //

हे गणराया,
तू असता सोबती
नसे परवा मज जगताची,
काही नसे उणे आता
प्रसन्न असे सरस्वती      //

हे गणराया,
असे चिंता तुजला ,
जनांच्या आरोग्याची संपत्तीची,
लाभत वरदहस्त तुझा
नसे चिंता काळ सर्पाची     //

हे गणराया,
असे मागणे एकच ठायी तुझ्या,
नका देवू अंतर आम्हा,
पुढल्या मासी परि लवकर या    //