Tuesday 1 March 2011

खरा प्रामाणिक

मी नेहमी रात्री ९ वाजता दादर ते कल्याण येतो. रात्री गाड्या कमी व भरलेल्या असतात म्हणून मी त्यावेळच्या मेल किंवा एक्स्प्रेस ने येतो. असेच दिवाळीच्या वेळी चालुक्य एक्स्प्रेस मध्ये चढलो. गर्दी नव्हती. जनरल मध्ये बसायला जागा मिळाली. T C सहसा येत नाही. मलाही अशा विदाऊट जाण्याचा अनुभव नव्हता. 
                  आणि ठाण्याच्या आसपास TC आला. मला काही सुचेना. सगळे प्यासेंजर माझ्याकडे पाहत होते. समोरचा काहीतरी सुचवत होता.TC ला कळले माझ्याकडे तिकीट नाही आहे ते. मी त्याला माझा लोकलचा पास दाखविला. त्याने मला निरखून पहिले. नॉर्थ इंडियन होता. म्हणाला आप पढे लोग, ऐसा कैसे करते हो वगैरे लेक्चर दिले. मी पण मनात म्हणालो चला रोज जातो एकदा शंभर रुपये दिले तरी नुकसान नाही. मी शंभर ची नोट दिली. त्याने नोट घेतली. मग म्हणाला , देखो तुम  पढे  लीखे दिखते  हो इसलिये पुरा चार्ज नाही लेता. वगैरे. आणि चक्क त्याने पन्नास रुपये परत केले. आणि पुढे निघून गेला. तो गेल्यावर सगळे म्हणाले कि ह्यांना फक्त १० रुपये द्यायचे असतात. किती प्रामाणिक TC  होता. मी सुद्धा अवाक होवून त्याचा प्रामाणिक पणा बद्दल विचार करू लागलो. तुम्हाला काय वाटत खरच तो प्रामाणिक होता.